शिरुर : प्रतिनिधी
शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांना पिंपखेड, ता. शिरुर येथे बॅकेवर पडलेल्या दरोड्याचा तपास लावुन आरोपीना गजाआड केल्याच्या कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले असुन या बद्दल त्यांचा विशेष सन्मान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बॅक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेवर २१ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसाढवळ्या दरोडा पडला होता . पिस्तुलाचा धाक दाखवित चोरट्यानी शेतकऱ्यांनी तारण ठेवलेले बॅकेतील ८ किलो २४० ग्रॅम सोने व रोख रक्कम असा २ कोटी ५५ लाख रुपये ऐवज चोरुन नेला होता भरदिवसा व तत्काळीन गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील गावात पडलेल्या या दरोड्याने मोठी खळबळ उडाली होती.
तत्काळीन पोलीस महासंचालक डॉ. मनोज लोहिया, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉं . अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषनचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी या गुन्हाचा तपास केला. या गुन्हाचा तपासासाठी ११ पथके तयार करण्यात आली होती. अवघ्या दहा दिवसात दरोड्यातील पाच आरोपीना जेरबंद करित चोरीला गेलेले ऐवज परत मिळविला.

या गुन्हाच्या तपासाबद्दल पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांना केंद्रीय गृहमंत्रालया कडुन केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे .
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत हे कर्जत ता. अहमदनगर येथील असुन सन १९९५ ला ते पोलीस सेवेत दाखल झाले यापुर्वी त्यानी मुंबई, ठाणे या परिसरात पोलीस निरीक्षक म्हणुन काम केले आहे. दरम्यान राउत यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाल्याबद्दल शहरातील विविध संस्था, संघटना यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.





