- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी पुणे नगर महामार्गावर एलईडी ब्लींक

वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी पुणे नगर महामार्गावर एलईडी ब्लींक

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
मागील काही दिवसांपासून कोरेगाव भीमा व परिसरातील पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून या मध्ये अनेक युवकांना आपला जीव गमवावा लागला. हीच खंत पाहून भाजपा कामगार मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या पुढाकाराने व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित ठेकेदाराच्या सहकार्याने पुणे नगर महामार्गावर एलईडी ब्लींक टाकण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा येथे मागील आठवड्यात झालेल्या अपघातात महेश गव्हाणे या युवकाला आपला जीव गमवावा लागला. महामार्गावर अनेक ठिकाणी चौकात रात्रीच्या वेळी विद्युत पोल नसल्याने अपघात होतात. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व लोकनेते माजी आमदार कै. बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून पुणे – नगर महामार्गाचे काम चालू आहे. वेगवेगळ्या अपघाती घटनांमध्ये तरुण सहकाऱ्यांना जीव गमवावा लागला. हीच गंभीरता लक्षात घेऊन वेळोवेळी संबंधित यंत्रणांना संपर्क करून कल्याणी फाटा, वाडा फाटा, डिंग्रजवाडी फाटा या अपघाती प्रवण क्षेत्रामध्ये एलईडी ब्लींकर बसविण्यात आले असल्याचे जयेश शिंदे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तसेच युवकांनी रस्ता मोठा झाला असला तरी ही वाहनांची वेगमर्यादा पाळणे आपण गरजेचे आहे. सर्व तरुणांनी वाहने हळू चालवा. आपला जीव महत्त्वाचा आहे. आपलं कुटुंब महत्वाच आहे. अशी भावना व्यक्त केली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page