निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्यातील रायरी येथे रायरी माद्यमिक विद्या. रायरी (डिजिटल स्कूल ) वार्षिक स्नेहसंमेलन व भव्य रौप्य महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.
यावेळी डिजिटल शाळेच्या इंटिरिऍक्टिव्ह डिजिटल पॅनलचे व माजी शिक्षक सूर्यवंशी सर यांच्या चित्र प्रदर्शनाचे उदघाट्न संस्थेचे अध्यक्ष राजेश राजे पंत सचिव यांच्या हस्ते झाले.
यावेळी कॅप्टन नवनाथ किंद्रे सहपरिवार तसेच भोर ऍजू सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, सचिव विकास मांढरे, डॉ गोरेगावकर, आर बी पवार, अंकुश घोलप, कृषी अधिकारी अशोक जेधे, कृष्णाजी तामकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्याताई तुपे, पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे, संस्थेचे पदाधिकारी, सरपंच नंदा किंद्रे, उपसरपंच वसंत किंद्रे,जनसेवक ध्रुव प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजीव केळकर, ग्रामस्थ नथू किंद्रे, सखाराम किंद्रे, नावजी किंद्रे, नामदेव किंद्रे, महादेव डेरे, बाळुबुवा किंद्रे, मारुती नाना किंद्रे आणि ग्रामस्थ आजी -माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन विध्यालयाच्या सुतार मॅडम, देशपांडे मॅडम तसेच माजी विध्यार्थी केशव किंद्रे यांनी केले. पांडुरंग किंद्रे यांनी आभार मानले.





