- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत रंगला लोकसेवा संकुलात गुणवंत गुरुजन, विद्यार्थी सन्मान सोहळा

बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत रंगला लोकसेवा संकुलात गुणवंत गुरुजन, विद्यार्थी सन्मान सोहळा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
फुलगाव, ता. हवेली येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, पुणे जिल्हा पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा पार पडला.
तब्बल ८०० गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि गुणवंत २०० शिक्षक अशा १००० गुणवंतांचा सन्मान यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा व त्यांना गुणवत्ता यादीत येण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांचा गौरव यावेळी करण्यात आला.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे पाटील व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा घेण्यात आला. या सन्मान सोहळ्यासाठी पुणे जिल्यातील व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळेतील गायन व संगीत विभागाचे संदीप जाधव यांनी आपल्या मधुर वाणीने मान्यवरांचे स्वागत केले. तबला विशारद रणजीत देशमुख यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य नरहरी पाटील व शिक्षक संघटनेचे पलांडे यांनी केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे व शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचा सत्कार फूलगाव चे माजी उपसरपंच राहुल वागस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांचा सत्कार नितीनजी बानगुडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे जिल्हा पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे यांच्या सत्कार बानगुडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यानंतर शिवव्याख्याते नितीनजी बानगुडे पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित यांची मने जिंकली. यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाची सुरुवात लवकर करावी लागते. मेहनतीची सुरुवात उशिरा केली की यश पण उशिराच प्राप्त होते असे प्रतिपादन त्यांनी केले. पुढे ते असेही म्हणाले की गुणवंतांचा सत्कार करणारेच खरे गुणवंत असतात. या उपक्रमाबद्दल बानगुडे पाटील यांनी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांचे भरभरून कौतुक ही केले. तब्बल सव्वा तास बानगुडे पाटील यांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले.
यानंतर गुणवंतांचा भव्य सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये पहिला सन्मान महाराष्ट्र राज्यामध्ये गुणवत्ता २९ यादीत प्रथम क्रमांक मिळवलेली इयत्ता आठवीची विद्यार्थिनी श्रावणी संजयकुमार पडवळ हीचा करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी फुलगावच्या सरपंच मंदानानी साकोरे, प्रशांत टिळेकर, योगेश चव्हाण, अनिल पलांडे, ADCI चे प्रमुख व लोकसेवा अकॅडमी चे मार्गदर्शक अनिस कुट्टी, बेंगलोर येथील सिग्मा सेंटर चे अमीन मुदासर, सरोज टिटोरियलचे प्रमुख व लोकसेवा अकॅडमी चे मार्गदर्शक महादेव सरोज, जेष्ठ पत्रकार दिपक दराडे, राजेंद्र पायगुडे, विनोद मोहिते, भानुदास साकोरे, प्रवीण चौढारी, सारंग सराफ, लोकसेवा ई स्कूलच्या प्राचार्या जया चेतवाणी, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, टेन टी. इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य पी शोफिमोंन, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य डेन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच लोकसेवा परिवारातील सदस्य, विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख व प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page