गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा येथील डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नासीर शेख, संस्थेचे सहसचिव जाहिद शेख, संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अमीर इनामदार तसेच डीलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एस डी नवले तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ एस डी नवले यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहिली तसेच सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या थोर युगपुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदन केले. उपस्थित सर्वांनी दोन मिनिट स्तब्ध राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.





