- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणध्रुव प्रतिष्ठान तर्फे भोर तालुक्यातील ग्रामपंचायतींना तिरडी व शिकाळे वाटप

ध्रुव प्रतिष्ठान तर्फे भोर तालुक्यातील ग्रामपंचायतींना तिरडी व शिकाळे वाटप

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठान चे राजीव केळकर यांच्या माध्यमातून व टेक्नोफोर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कासुर्डी यांच्या सहकार्याने हुतात्मा दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींना स्टेनलेस स्टील पासून बनवलेली तिरडी व शिकाळे वाटप भोर मधील पंचायत समिती गेस्ट हाउस येथे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील ध्रुव प्रतिष्ठान हे नेहमीच समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणी त्यातच त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून तिरडी वाटपाचा उपक्रम राबविण्याचे ठरवले व वाटप देखील केले.
ग्रामीण भागात बांबू व कडबा अंत्ययात्रेसाठी वापरले जाते आणी ती प्रथा कुठेतरी बंद व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यांच्या ह्या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे. उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. तसेच राजीव केळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बांबू पासून किती फायदा होतो याचे महत्व उपस्थितांना पटवून दिले व भविष्यात हिरडस मावळ भागात रस्त्याला जागोजागी स्टॉल लावून बांबू पासून बनणाऱ्या वस्तू तसेच त्याचे प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल याचेही मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. तसेच जुन्या पारंपरिक पद्धतीने बांबू व कडबा पासून अंत्ययात्रेची तिरडी बनविण्याचे रोखले तर पर्यावरणातील वनसंपत्तीचा ऱ्हास होणार नाही व जाणवरांचा चारा वाया देखील जाणार नाही. तसेच स्मशानभूमी व नदी किनाऱ्यावरील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणी पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असेही केळकर म्हणाले. या वेळी संतोष ढवळे लिखित आम्ही वाल्हेकर हे पुस्तक देखील उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या कार्यक्रमा प्रसंगी भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ तसेच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page