हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यातील हिर्डोशी येथे दि २६ रोजी त्रेपन्न गावचे असणारे कुलदैवत श्री वाघजाई,वरदायीनी,व नवलाई देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती.
कार्यक्रमादरम्यान होमहवन, सत्यनारायण महापूजा, कलश मिरवणूक, कलशारोहण, कीर्तन, गोंधळ असे विविध कार्यक्रम देखील पार पडले.या कार्यक्रमानिमित्त अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी येथील संस्थेचे संस्थापक अॅड ह.भ.प. श्री राहुल महाराज पारठे यांची सुश्राव्य अशी कीर्तन सेवा पार पडली या कीर्तनासाठी ऋषिकेश महाराज शिंदे यांनी मृदंग साथ दिली. तर गायणाचार्य म्हणून ह.भ.प.मुरलीमहाराज साबळे व चंद्रकांत महाराज दिघे यांनी साथ दिली.

या प्रसंगी भोर वेल्हा मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम दादा थोपटे, लहु नाना शेलार, नितीन दामगुडे, विजय शिरवले, भाऊ मेहता सह आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभावेळी संतोष नारायण दिघे यांची विभागीय पुनर्वसन समिती सदस्य पदी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला असून आदी उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.





