हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागामधील वारवंड गावचे सुपुत्र तसेच दिघे वाडा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक श्री.संतोष नारायण दिघे यांची पुणे विभागीय पुनर्वसन समिती पुणे अशासकीय सदस्य पदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.
धरण ग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लावणे तसेच पुनर्वसन सुरळीत पार पाडावे व पुनर्वसनाची कारवाई करताना येणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधीचा समावेश आवश्यक असल्यामुळे श्री संतोष नारायण दिघे यांची पुनर्वस्यातील अभ्यासू व माहितिगार व्यक्ती म्हणून माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी अशासकीय सदस्य पदी दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

संतोष दिघे यांची अशासकीय सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल तालुक्यातून तसेच हिरडस मावळ भागातून त्यांचे कौतुक होत आहे.





