- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणश्री गणेशाच्या जयघोषाने भोर ला गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

श्री गणेशाच्या जयघोषाने भोर ला गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
 भोर शहरातील सुप्रसिद्ध कुंभार टेकटी तालीम ट्रस्टच्या वतीने गणेश जयंती मोठ्या आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. गेली ३५ वे वर्ष अखंड हरिनाम सप्ताहात विविध भागातील नामांकित कीर्तनकारांची समाज प्रबोधनपर किर्तन आठवडाभरात संपन्न झाली.
रविवारी श्री गणेश याग होमहवन पाच जोडप्यांच्या हस्ते विधीपूवर्क संपन्न झाले. बुधवारी सकाळी श्री गणेश अथर्वशीर्ष व अभिषेक 21 आवर्तन श्री गणेश मूर्ती, पादुका ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर श्री गणेश जन्म आख्यान, प्रवचन होऊन दुपारी 12.30 मिनिटांनी गणेश जन्म मोठ्या उत्साहात साजरा झाला.


श्री गणेश जन्म झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने देवाचा पाळणा उपस्थित महिलांनी भजन करत म्हणून वातावरण चैतन्यमय होऊन गेले. भाविकांना देव भेट कार्यक्रम होऊन सर्वाना सुंठवडा प्रसाद देण्यात आला. यानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी 6 वाजता श्रीच्या पादुका असलेली पालखी ग्राम प्रदक्षिणासाठी प्रस्थान मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
ग्रामप्रदक्षीण पूर्ण करत अभंग, टाळ व नाम घोष करत राजवाडा येथील पवित्र नीरा नदीच्या पाण्याने पादुका स्नान पार पाडून वाजत गाजत पालखी मंदिरात दाखल झाली. त्यानंतर महाआरती होऊन प्रसादाचे वाटप उपस्थित भाविकांना करण्यात आले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या सोहळ्यास तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन दर्शन घेतले यावेळी कुंभार टेकडी तालीम ट्रस्ट कडून उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व श्री गणेशाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात केला गेला. त्यानंतर प्रसाद देऊन श्री गणेश जयंती सोहळ्याची सांगता झाली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page