शिरुर प्रतिनिधी
कोरोनोचे निर्बंध दुर झाल्यावर होत असणा-या गणेशजयंतीसाठी मोठ्या उत्साह गणेश मंडळाचे कार्यकर्ते व भाविका मध्ये होता. शहरातील प्रसिद्ध असणा-या हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा हलवाई गणेशाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. नवसाला पावणा-या अशी ख्याती असणा-या हलवाई गणेशास यंदाचा वर्षी चांदीचा हार अर्पण करण्यात आला. यापूर्वी ही हलवाई गणेशास विविध चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे.
गणेश जयंती निमित्त हलवाई गणेश मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. त्याच बरोबर संगमरवरी असणा-या मंदिरावर आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली. हलवाई गणेश मित्र मंडळाने काही वर्षापूर्वी गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून त्यातून वाचलेल्या खर्चातून परिसरात ९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सह महिलासाठी महाआरती व विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जात असतात.
दरम्यान गणेश जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती संभाजी गणेश मित्र मंडळ संभाजीनगर (हुडको कॉलनी), सुवर्णयुग गणेश मित्र मंडळ, युवा संघर्ष गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार, आझाद हिंद गणेश मित्र मंडळ सुभाष चौक, कुंभार आळीतील विठ्ठल मंदिर, ओमरुदा सोसायटी रामलिंग रोड, छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळ लाटेआळी येथे ही गणेश जयंती निमित्त गणेश याग, भजन, महाआरती महाप्रसाद अश्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कुंभार आळीतील विठठल मंदिरातील श्री गणेशाच्या मुर्तीची भव्य अशी मिरवणुक गणेश जयंतीनिमित्त काढण्यात आली यात मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या .
दरम्यान अष्टविनायका पैकी एक असणा-या रांजणगाव गणपती येथील महागणपतीचा मंदिरात ही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.





