बी.जे.एस. चे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर बकोरी येथे
गजानन गव्हाणे पाटील
वाघोली, ता. हवेली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने बकोरी (पुणे) येथे विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना स्वतःचे कौशल्य आजमावता येते असे मत प्राचार्य संतोष भंडारी यांनी व्यक्त केले. तर मुलांना एनएसएस मधून मिळणारा अनुभव हा भविष्याची शिदोरी असते असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक पवार, उपप्राचार्य गेटे, प्रा. फडतरे, प्रा. बाबासाहेब गव्हाणे सर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शांताराम वारघडे, पूनम वारघडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम आधिकारी प्राध्यापक विजय अंधारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राणी तोरडमल यांनी तर प्रा. प्रज्ञा चासकर यांनी आभार मानले.





