- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणफ्रेंड्स स्कुल मध्ये वाहतूक नियमांन बाबत जनजागृती करत प्रतिज्ञा

फ्रेंड्स स्कुल मध्ये वाहतूक नियमांन बाबत जनजागृती करत प्रतिज्ञा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वाहने चालविताना व रस्त्याने पायी जाताना दोघांनी ही वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट व चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्ट लावल्यास अपघातात जीव वाचेल असे मत मोटर वाहन निरीक्षक ललित देसले यांनी व्यक्त केले.


कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये रस्ते सुरक्षा उपक्रमाचे अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांचे सोबत मोटर वाहन निरीक्षक प्रसाद थोरात, सहाय्यक वनिता शिंदे यांनी ही विद्यार्थ्यांना वाहतुकीचे विविध नियम व चिन्हे यांची सखोल माहिती दिली. तसेच यावेळी मुलांना वाहतूक नियमांची प्रतिज्ञा देण्यात आली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे, संचालक राजेंद्र गव्हाणे, विद्यालयाचे प्राचार्य मदन हराळ, उप प्राचार्य अजिता नायर, उद्योजक विकी गव्हाणे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण मार्गदर्शन शिबिराचे नियोजन गव्हाणे मोटर्स यांचे वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन प्रियांका फडतरे, माधुरी गुंडाळ यांनी केले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page