सासवड : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी सातत्य चिकाटीने यश संपादन करत कला, कौशल्य व क्रीडा मध्ये यश संपादन करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे संगीता डावखर यांनी आपल्या अध्यक्षणीय भाषणात केले. शासकीय निवासी शाळा दिवे, ता. पुरंदर येथे कला व क्रीडा आविष्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
समाजकल्याण विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील चार शासकीय निवासी शाळा व एक शासकीय साफसफाई कामगारांच्या मुलींच्या शाळेत सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडा नैपुण्य विकसित होण्यासाठी “कला व क्रीडा आविष्कार” या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी भूमिका अभिनय लोक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच क्रीडा स्पर्धे अंतर्गत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, रिले, लांब उडी, थाळीफेक, रस्सीखेच व खोखो या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती पुरंदर पी. एस. मेमाणे तसेच स्वागत विशेष अधिकारी शासकीय निवासी शाळा/समाज कल्याण पुणे मल्लिनाथ हरसुरे यांनी केले. यावेळी श्री. अल्हाट समाज कल्याण पुणे व इतर मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पि. के. डावखर यांनी केले. यावेळी सदर स्पर्धांच्या आयोजनाबाबत समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, प्रादेशिक उपयुक्त समाजकल्याण विभाग पुणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले

स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन खोसे जे. डी. यांनी केले.





