शिरुर : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरुर यांच्या वतीने प्रितम-प्रकाशनगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले असुन या ठीकाणी श्री स्वामी समर्थ यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा बुधवार दिनांक २५ जानेवारी व गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर व खजिनदार गणेश घाटगे यांनी आपली लोकशाही स दिली.
त्यांनी सांगितले की बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी गणपती पुजन, मातृका पुजन, वास्तुपीठ पुजन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर ग्रामप्रदक्षिणा (मिरवणुक) व धान्यादीवास मिरवणुक दु. ४:०० वाजता सुरजनगर येथुन निघणार असुन शहरातील प्रमुख भागातुन ही मिरवणुक जाणार आहे .विविध वाद्यपथकाच्या या मिरवणुकीत सहभाग असणार आहे .
गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी कलशारोहन व मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त स्वामी समर्थ मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात येत असुन सकाळी ८:०० वा. होमहवन होणार आहे. यावेळी देवदैठण येथील किर्तनकार आचार्य परमेश्वर महाराज दंडवते यांचे किर्तन होणार आहे. दुपारी १:०० वा. कलशारोहन, मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा व महाआरती होणार आहे. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन दोन दिवस होत असणा- या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था यांनी केले आहे .

शहरातील प्रितम प्रकाश नगर येथे स्वामीचे भव्य असे मंदिर उभे करण्यात आले असुन मंदिराच्या गाभारा समोर सभा मंडप बांधण्यात आला आहे. मंदिरातील स्वामी समर्थ यांची मुर्ती राजस्थान मधील उदयपुर येथुन आणण्यात आली आहे. विविध झाडे व फुलझाडे लावुन परिसर हिरवेगार करण्यात येत आहे .भविष्यात आधिकाधिक सेवा सुविधा भाविकाना देणार असल्याचे योगेश वाळकीकर व गणेश घाडगे यांनी सांगितले .
श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरुरचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष ॲड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाटगे, विश्वस्त चंद्रकांत निघोजकर, प्रभावती पवार, मंगला बागमार, संपत लोखंडे, विष्णु वेताळ, भुषण कडेकर आदीसह अनेक स्वामीभक्तांच्या पुढाकारातुन व योगदानातुन शिरुर शहरात स्वामी समर्थ यांचे मंदिर उभारणीचे स्वप्न साकार होत असल्याचे अध्यक्ष वाळकीकर यांनी सांगितले.





