गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, तालुका शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नागेश गव्हाणे पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने नागेश गव्हाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

भरपूर विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे, कलागुनांकडे शालेय समितीच्या वतीने जबाबदारीने लक्ष दिले जात असल्याने, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकडे पालकांचे जास्त लक्ष आहे. 17 सदस्य संख्या असणाऱ्या या समितीवर सर्व सदस्य अनुभवी आणि हुशार आहेत, त्यांच्या माध्यमातून शाळेमध्ये चांगले काम पाहिले जात आहे, अध्यक्षपदाच्या निवडीनंतर गव्हाणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीकडे जास्त लक्ष दिले जाणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले जाणार आहे, शिक्षणाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर करून शिक्षक वृंद, पालक वर्ग यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम तसेच मंजूर असलेला 33 लाख रुपये निधी मध्ये शाळेचे इमारतीचे बांधकाम करून घेणार आहोत असे सांगितले, ग्रामस्थांनी गव्हाणे यांचे सत्कार करून पुढील कामाच्या शुभेच्छा दिल्या,





