हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
शिक्षण विभाग पंचायत समिती भोर संविधान शिक्षण उपक्रमांतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक सन २०२३ – २४ पार पडली. भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या संकल्पनेतून तसेच केंद्रप्रमुख अलका लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने पार पडली.

मागील वर्षी स्वानंदी व बिसा हे उपक्रम तालुक्यात यशस्वीपणे राबविल्यानंतर चालू शैक्षणिक वर्षी मुलांना निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी संविधान शिक्षण उपक्रमांतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया भोर तालुक्यातील प्राथमिक शाळेंमध्ये पार पडली. या मध्ये हिरडोशी केंद्रामध्ये एकूण 14 शाळा असून प्रत्येक शाळेवर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया पार पडली असून विध्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करण्याचा हक्क बजावला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढरी केंद्र हिरडोशी येथे पार पडलेल्या निवडणुकीत निवडणूक आयोग म्हणून मुख्यनिवडणूक आयुक्त शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही. चव्हाण, सहाय्यक निवडणूक आयुक्त शाळेचे शिक्षक पंडित पारठे पदसिद्ध सदस्य नथुराम ज्ञानोबा पारठे यांनी काम पाहिले. या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून स्वराज दिपक पारठे व कल्याणी दिलीप कालवनकर यांची निवड करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया १०० टक्के पार पडली असताना दुसऱ्या दिवशी मतमोजणीचा कार्यक्रम झाल्यानंतर स्वराज ला ७ मते तर कल्याणी ला ३ मते मिळाली असून स्वराज हा मुख्यमंत्री तर कल्याणी हिची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली असून दोन्हीही उमेदवार विध्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विध्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.
.





