- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाठार येथे इंडियन आर्मी दिवस निमित्त आर्मी चषक भव्य क्रिकेट सामने संपन्न

वाठार येथे इंडियन आर्मी दिवस निमित्त आर्मी चषक भव्य क्रिकेट सामने संपन्न

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
भोर तालुक्यातील वाठार (हि.मा.) येथे शिवमुद्रा युवा मंडळ साळेकर वाडी वाठार (हि.मा.) व शिवमुद्रा क्रिकेट क्लब वाठार (हि.मा.) यांच्या आयोजनातून इंडियन आर्मी दिवस निमित्त आर्मी चषक २०२३ भव्य क्रिकेट सामने संपन्न झाले.
या क्रिकेट सामन्यासाठी प्रथम क्रमांक भोर वेल्हा मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम दादा थोपटे यांच्याकडून 11001 रुपये, द्वितीय क्रमांक वाठार चे तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामचंद्र शिवराम खाटपे व पोलीस पाटील आनंदा वसंत खाटपे 9001/ रुपये. तृतीय क्रमांक वाठारच्या नवनिर्वाचित सरपंच सविता संजय खाटपे 7001/ रुपये. चतुर्थ क्रमांक कै. रामचंद्र मारुती दानवले यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते ए. के. दानवले यांच्याकडून 5001/ रुपये. तर पाचवा क्रमांक शिवमुद्रा युवा मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रघुनाथ साळेकर यांच्याकडून 3001/ रुपये बक्षिसे ठेवण्यात आली होती.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या क्रिकेट सामन्यात २०२३ चे आर्मी चषक विजेते प्रथम क्रमांक बारे, द्वितीय क्रमांक रायरी, तृतीय क्रमांक देवघर, चतुर्थ क्रमांक पिसावरे तर पाचवा क्रमांक वाठार (हि.मा.) यांनी पटकावले. तसेच मालिकावीर शुभम खोपडे बारे, उत्कृष्ट फलंदाज ऋषी दानवले बारे, उत्कृष्ट गोलंदाज साहिल ढवळे देवघर व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गणेश केंद्रे रायरी यांना देखील बक्षिसे देण्यात आली.
या क्रिकेट सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील आर्मी सैनिकांचा सन्मान देखील करण्यात आला तसेच या सोहळ्यासाठी शिवमुद्रा युवा मंडळाचे अध्यक्ष संजय दानवले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळेकर, कार्याध्यक्ष राजेश दानवले, सचिव सर्जेराव साळेकर, खजिनदार नारायण साळेकर, दत्तात्रय साळेकर, सुनील साळेकर, सचिन रामचंद्र खाटपे, माजी सरपंच विष्णू पर्वती खाटपे व मंडळाचे पदाधिकारी, क्रिकेट रसिक प्रेमी व प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page