गजानन गव्हाणे पाटील
केसनंद, ता. हवेली येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा शोभा हरगुडे यांची नुकतीच अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शोभा हरगुडे यांना समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाळेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारिणी सदस्या लीला हरगुडे, उप तालुकाध्यक्षा शामा लवटे, प्रीती दुपारदे, विशाखा हरगुडे आदी यावेळी उपस्थित होते. समितीच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार यावर आवाज उठवणार असून महिलांना कराटे व स्वरक्षणाचे धडे गिरविण्यासाठी प्रशिक्षण शिबीर लवकरच आयोजित करणार असल्याचे यावेळी शोभा हरगुडे यांनी स्पष्ट केले.





