- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमाच्या सरपंच पदी विक्रम गव्हाणे

कोरेगाव भीमाच्या सरपंच पदी विक्रम गव्हाणे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील राजकीय आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच अपेक्षेप्रमाणे जय मल्हार पॅनेलचे विक्रम कचरुदास गव्हाणे यांनी माजी सरपंच व विद्यमान सदस्य संदिप ढेरंगे यांचा १० विरुध्द सात मतांनी बहुमताने पराभव करत सरपंचपदी बहुमताने निवड झाली.


सरपंच अमोल गव्हाणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपदासाठी झालेल्या निवडनुकीत जय मल्हार पॅनेलच्या वतीने विक्रम गव्हाणे, केशव फडतरे व अनिकेत गव्हाणे यांनी तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वतीने संदिप ढेरंगे, महेश ढेरंगे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या वेळी केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे व महेश ढेरंगे यांनी अर्ज माघार घेतल्याने सरपंचपदासाठी झालेल्या निवडणूकीत जय मल्हार पॅनेलचे विक्रम कचरुदास गव्हाणे यांनी माजी सरपंच व विद्यमान सदस्य संदिप ढेरंगे यांच्यात सरळ सरळ लढत झाली यावेळी १० विरुध्द सात मतांनी बहुमताने संदीप ढेरंगे यांचा पराभव केल्याने सरपंचपदी विक्रम गव्हाणे यांची बहुमताने निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी विकास फुके यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रतन दवणे यांनी काम पाहिले. तर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी आतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, संदिप कारंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी जय मल्हार पॅनेलचे विठ्ठलराव ढेरंगे, बाळासाहेब फडतरे, अशोक काका गव्हाणे, अनिल काशिद, माजी सरपंच अनिल कोल्हे, अशोक काशिद, संजय काशिद, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, अरविंद गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, संपत गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, सदस्य केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, गणेश कांबळे, सदस्या मनिषा गव्हाणे, शैला फडतरे, अर्चना सुपेकर, सविता घावटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page