गजानन गव्हाणे पाटील
नुकत्याच झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू बुद्रुक येथील दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार यांनी दिली.

विद्यालयातील शुभम शिवाजी कोव्हाळे जिल्हा गुणवत्ता यादीत दहाव्या स्थानावर तसेच आयुष नितीन गंगावणे जिल्हा गुणवत्ता यादीत एकोणिसाव्या स्थानावर आहेत. या विद्यार्थ्यांना एकनाथ रोकडे व उत्तम भंडारे यांनी मार्गदर्शन केले. मुलांच्या या यशाबद्दल शालेय शिक्षण समितीच्या व इतरांनी शुभेच्छा दिल्या.






