- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआर. टी. ओ. पुणे, शहर पोलिस, वाहतूक पोलिस व दक्षिण पुणे मोटार...

आर. टी. ओ. पुणे, शहर पोलिस, वाहतूक पोलिस व दक्षिण पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवित सुरक्षा अभियान संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे शहर पोलिस, पुणे वाहतूक पोलिस व दक्षिण पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील दत्तनगर, कात्रज भागात रस्ता विविध उपक्रम राबवित सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने रस्ते सुरक्षितता प्रबोधन श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक हॉल, दत्तनगर कात्रज येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याला मोठा प्रतिसाद मिळत असंख्य मोटर ड्रायव्हिंग मालक व त्यांचे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ श्रीहरी बहिरट, ९५ बिग एफ एम चे आरजे बंड्या, मोटार वाहन निरीक्षक अनिल खेमनर, मोटार वाहन निरीक्षक विलास वडीतके, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती वृंदा मारके, शुभम पाटील, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे, महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष राजू घाटोळे व गणेश देवकर, गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक हे उपस्थित होते.
दक्षिण पुणे भागातील महेश ड्रायव्हिंग स्कूल, भरत ड्रायव्हिंग स्कूल, मेसेज ड्रायव्हिंग स्कूल, स्टार ड्रायव्हिंग स्कूल, स्वराज ड्रायव्हिंग स्कूल, राजेश ड्रायव्हिंग स्कूल, न्यू कैलासगिरी ड्रायव्हिंग स्कूल, शिळीमकर ड्रायव्हिंग स्कूल, राधेश्याम ड्रायव्हिंग स्कूल, ड्राईव्ह इझी ड्रायव्हिंग स्कूल, कादंबरी ड्रायव्हिंग स्कूल, ऋग्वेद ड्रायव्हिंग स्कूल ने सहभाग घेऊन त्यांच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबतीत प्रबोधन केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्याच बरोबर लकी ड्रॉ द्वारे हेल्मेट वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा दिनदर्शिकेचे उदघाटन करण्यात आले तसेच दक्षिण पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटने तर्फे नेत्र तपासणी शिबारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार भरत गायकवाड यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page