- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणअल अमीन एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरक्षा सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन

अल अमीन एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरक्षा सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
आजच्या वयातील मुलांना आपल्या अधिकाराची व कर्तव्यची जाणीव नाही तसेच त्याची जाणीव करून देण्यात ही पालक कमी पडत आहेत. महाविद्यालयात जाणाऱ्या पाल्याची अप्रिय घटना घडल्यावर पालक जागा होणार का असा सवाल उपस्थित करत अपघाताची महासत्ता आपण झालो हे खेद जनक असल्याचे यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचे मोटर वाहन निरीक्षक संदीप मुरकुटे यांनी व्यक्त केले.


कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील अल अमीम एज्युकेशन सोसायटीमध्ये रस्ता वाहतूक सप्ताहाचे अंतर्गत कार्यक्रमात मुरकुटे बोलत होते. प्रादेशिक अधिकारी पुणे डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी पुणे संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे.
यावेळी सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक जयंत काटे, श्रद्धा कंदाकुरे, वाहन चालक सुभाष मंडलिक, सीईओ अल अमीन सोसायटी अमीर इनामदार, गव्हाणे मोटर्स चे राजेंद्र गव्हाणे, फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रकाश खैरमोडे, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलाबक्ष्य शेख, ग्लोरी कनिष्ठ महाविद्यालयीचे प्राचार्य अनिल मिश्रा, उद्योजक विकी गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.
संदीप मुरकुटे पुढे म्हणाले की, दरवर्षी देशात रस्ते अपघातात 1 लाख 60 हजार ते 1 लाख 75 हजार मरण पावतात. यातील अनेक 18 ते 22 वयोगटातील तरुण असतात. कोरोना मध्ये दर कमी होता. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची वाहने चालवीत असताना उपयोगात येणाऱ्या चिन्हांची माहिती देण्यात आली. तसेच मुलांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन गव्हाणे मोटर्स व विद्यालयाच्या शिक्षिका प्रा. मंगल गायकवाड, प्रीती शिंदे, वर्षा दिघे, कोमल फराटे, रेशमा पवार, निळोफर मोमीन आदींनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी लांडगे, स्नेहल खेडकर यांनी तर आभार डी फार्म चे प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page