- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहिर्डोशी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

हिर्डोशी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील हिर्डोशी येथे राजगड ज्ञानपीठ संचलित समर्थ रामदास स्वामी विद्यालय हिर्डोशी येथे संस्था वर्धापन व क्रीडा सप्ताह दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोंढाणा, शिवनेरी, तोरणा, रायगड, प्रतापगड, असे वेगवेगळे कुल पाडून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, खो-खो स्पर्धा, लांब उडी स्पर्धा, चमचा लिंबू स्पर्धा, आणि संगीत खुर्ची स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते यामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाचे मानकरी यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या सर्व कार्यक्रमासाठी लागणारे मानचिन्ह (ट्रॉफी) भेलके सर व बुदगुडे सर यांनी आयोजन केले होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका हांडे मॅडम व सूत्रसंचालन राजेशिर्के सर तर आभार डांगे सर यांनी मानले. तर भेलके सर व बुदगुडे सर तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत देखील व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजगड ज्ञानपीठ चे विशेष कार्यकारी अधिकारी जेटीथोर सर व प्रमुख पाहुणे म्हणून राजगड ज्ञानपीठ चे विश्वस्त पंढरीनाथ भिलारे तसेच पत्रकार दीपक पारठे आणि रोटरी क्लब भोर चे सदस्य प्रा. कुलकर्णी सर उपस्थित होते. तर ग्रामस्थ जिजाबा पारठे, अशोक पारठे, दिनकर पारठे, गणेश धामुनसे, संदीप धामुनसे, संतोष दिघे, दीपक धामुनसे, नीता राजिवडे, सीता पारठे, संगीता पारठे, दीपाली मालुसरे, सुरेखा धामुनसे, यशवंत गोडावळे, संकेत धामुनसे, हनुमंत धामुनसे तसेच पंचक्रोशीतील पालक वर्ग, महिला वर्ग व युवक उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page