वडगाव शेरी प्रतिनिधी : माऊली उंद्रे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोल्फ चौकातील “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” उड्डाणपुलाचे उद्घाटन जल्लोषात संपन्न झाले.

या बरोबरच शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या संकल्पनेतून हा उड्डाणपूल साकारण्यात आला असून यामुळे वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
देवेंद्रजींच्या कणखर नेतृत्वात पुण्यनगरीच्या विकासाची गाडी भरधाव वेगाने पुढे जात आहे. आगामी काळात वडगांव शेरीच्या रखडलेल्या विकासालाही त्यांच्या नेतृत्वात गती मिळेल असा विश्वास भाजपा शहर अध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, योगेश टिळेकर, बापुसाहेब पठारे, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, हेमंत रासने, गणेश बिडकर, धिरज घाटे, आयुक्त विक्रम कुमार, कुणाल खेमनार, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपूरे ,दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, श्रीनाथ भिमाले, वडगाव शेरी विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील उंद्रे तसेच सर्व माजी नगरसेवक महापालिका अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.







