निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्यातून स्वामी समर्थ मठ भोर येथून भोर – पंढरपुर – अक्कलकोट – गाणगापुर – मलगट्टी – हुमनाबाद – माणिक प्रभू – पिठापुर – श्री जगन्नाथ पुरी अशीही पवित्र पारिवारी परिक्रमा (पायवारी) २ महिन्यामध्ये पुर्ण करून नुकतेच भोर येथील मठामध्ये आगमन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
निगुडघर येथे शंकर महाराज पादुका, स्वामी समर्थ पादुका अक्कलकोट, दत्त निर्गुण पादुका गाणगापुर या पादुकाची भव्य मिरवणूक काढुन पुजन करण्यात आले. पालखीमध्ये सर्व पादुका श्री मार्लेश्वर मंदिरात नेऊन पुजन करून तिथुन पुढे गावदेव श्री भैरवनाथ मंदिरात पुजन करण्यात आले. गावामध्ये पालखी पुढे महिलांनी डोक्यावर कलश, आंब्याची डाहळी व नारळ घेऊन पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

ढोल ताशानी कार्यक्रमाची शोभा वाढवली. पालखी पुढे फुले टाकत पादुकाचे व परिक्रमा पुर्ण करणाऱ्याचे स्वागत मोठ्या आंनदात करण्यात आले. पालखी वाजतगाजत श्री जननी कुंबळजा देवीच्या मंदिरात नेऊन भव्य मिरवणूक काढून सर्व पादुकाचे पुजन करण्यात आले . मंदिरामध्ये दत्तयोग होमहवन करण्यात आला. आलेल्या सर्व भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला





