- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीण४२५ व्या ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात मानवंदना देण्यासाठी राजगडावर मावळ्यांचा जनसागर

४२५ व्या ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात मानवंदना देण्यासाठी राजगडावर मावळ्यांचा जनसागर

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना ४२५ व्या ऐतिहासिक सोहळ्या मानवंदना देण्यासाठी राजगडाच्या पायथ्याला पाल बुद्रुक (ता.वेल्हे ) येथील मावळा तिर्थावर मावळ्यांचा जनसागर लोटला होता. जिजाऊंना वंदन करण्यासाठी पुण्यासह सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, बीड सांगली आदी ठिकाणांहून महिला, जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशा, तुतारी च्या निनाद व जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने राजगडाची दरी खोरी दुमदुमून गेली. राज्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलां तसेच गुणवंतांना पुरस्काराने गौरविण्यात आले.


हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पारंपारिक रिवाजात पुजन करून मानवंदना देण्यात आली . रायरेश्वराचे शिवाचार्य सुनिल स्वामी जंगम यांच्या शिव जिजाऊ वंदनेने सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटे हणुमंत दिघे व शिवाजी भोरेकर यांच्या हस्ते राजगड पुजन करण्यात आले. प्रास्ताविक इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी केले.
कर्नल सुरेश पाटील, मनपाचे उपायुक्त रमेश शेलार, वेल्हेचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, कोल्हापूर येथील शिवकन्या प्रतिष्ठानचे किरण गुरव, सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर, सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज ऋषिकेश गुजर, राष्ट्रसेवा समुहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, सुनिल राजेभोसले, संतोष शिवले, दत्तात्रय पाचुंदकर, गणेश राऊत, सरपंच निता खाटपे, विनोद माझिरे, नानासाहेब शिळीमकर, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ आदी उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांनी व्याख्यानातुन जिजाऊं, शिवराय यांच्या विश्वंवदनिय शौर्याचा इतिहास जिवंत केला.
राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने शिरुर येथील जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर व बारामती येथील लेखिका अर्चना सातव यांचा सन्मान करण्यात आला. तर राष्ट्रीय मावळा भुषण पुरस्काराने चिंबळी येथील शिवाजी बबनराव गवारे, भोर येथील समीर घोडेकर व खेड येथील दिव्यांग उद्योजक अमोल चौधरी यांचा तसेच
राष्ट्रीय गुणवंत खेळाडू पुरस्काराने पुण्यातील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संपन्न रमेश शेलार यांचा सन्मान करण्यात आला.
छत्रपती महाराणी ताराराणी गौरव पुरस्काराने कोल्हापूर येथील पुजा यमगर, शिवानी कोळी, साक्षी मोहिले यांचा व आदर्श शिक्षक पुरस्काराने पुण्यातील प्रा. किर्ती शशिकांत जाधव, मधुबाला कोल्हे, काळदरी येथील प्राचार्य पांडुरंग पाटील व आदर्श सरपंच पुरस्काराने मेरावण्याचे सरपंच सत्यवान रेणुसे यांचा व राजगडावर चढाई करणाऱ्या तीन वर्षे वयाच्या आरोही राजेंद्र रणखांबे हिच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी राजगड तोरणा भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप देखिल करण्यात आले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भिंताडे व शशिकांत जाधव यांनी केले. संयोजन तानाजी भोसले,विजय महाराज तनपुरे, लक्ष्मण दारवटकर, अर्जुन खाटपे, पप्पू गुजर, रोहित महापुरे, रोहित नलावडे, निलेश पांगारकर, संतोष वरपे, उमेश अहिरे, संदिप खाटपे, आप्पा जावळकर, प्रशांत भोसले, आप्पा जोरकर, मधुकर मालुसरे, गंगाराम शिर्के, अनंता खाटपे , आण्णासाहेब भरम, महेश पानसरे
आदींनी संयोजन केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page