- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपानिपत ला जाऊन पुणे जिल्ह्यातील मराठ्यांनी दिली मराठा योध्यान्ना मानवंदना

पानिपत ला जाऊन पुणे जिल्ह्यातील मराठ्यांनी दिली मराठा योध्यान्ना मानवंदना

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
लोक म्हणतात पानिपत ही मराठ्यांची व्यथा आहे परंतु खऱ्या अर्थाने पानिपत ही तर मराठ्यांची शौर्यगाथा आहे. ज्या लढ्यामध्ये मराठ्यांचा पराभव होऊ नये अब्दालीला पळून जावे लागले तेही पुन्हा कधीही दिल्लीच्या वाटेस न जाण्याचा विचार करूनच. असे हे अहमद शहा अब्दाली आणि मराठी यांच्यात १४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतचे तिसरे युद्ध झाले त्याला यावर्षी २६२ वर्ष पूर्ण होत आहेत.
दिल्लीच्या तक्ताचा रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या मराठी मावळ्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिरूर तालुक्यातून बापूसाहेब ढमढेरे, विठ्ठलराव देशमुख, उमेश दादा धुमाळ, आप्पासाहेब जगदाळे, अनिल पलांडे, मंगेश येवले, सचिन पवार, खेड तालुक्यातून संतोष गाढवे आणि मनोहर भालके यांनी शौर्यपीठ बस्ताडा पानिपत हरियाणा या ठिकाणी जाऊन पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत या वीर योद्धांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

महाराष्ट्रातील मराठा आणि हरियाणातील रोड मराठा बांधव यांच्यातील असलेले ऋणानुबंधाचे नाते अधिक सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या कामी हरियाणातील वीरेंद्र मराठा व राजवीर चोपडा यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर मावळ्यांनी बसताना या ठिकाणी शौर्यपिठावर झालेल्या कार्यक्रमास हजेरी लावली त्याचबरोबर पानिपत बॅटल फिल्ड म्हणून काला आम पार्क या ठिकाणी असणाऱ्या शूर मराठी योद्धांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केले. छत्रपती शिवरायांची आरती गाऊन
गारद देऊन
गारठले होते नशीब
साकळे जरी होते रक्त
एक पिढी खर्च जाहली
राखण्या दिल्लीचे तख्त.
अशा स्वरूपाची काव्य रचना सचिन पवार यांनी करून त्या कार्यक्रमाची सांगता केली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page