गजानन गव्हाणे पाटील
पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकावला. अंतीम सामन्यात दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झालेले आहेत.

वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. ज्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. यावेळी चांदीची गदा, पाच लाख रुपये व एक चारचाकी थार गाडी शिवराज राक्षे ला देण्यात आली.





