गजानन गव्हाणे पाटील
भीमआर्मी पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच संदीप साहेबराव शेलार यांनी नियुक्ती करण्यात आली. भीमआर्मी प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांच्या हस्ते निवडीचे पत्र संदीप शेलार यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज पठाण, पुणे जिल्हा महासचिव अविनाश उबाळे, जिल्हा संघटक पै. दिलावर शेख, पारनेर तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, शिरुर अध्यक्ष दीपा भालेराव, श्रीगोंदा अध्यक्ष सूर्यकांत धामणे, जमीर शेख, सचिन डाके, सिद्धार्थ गायकवाड, कैलास वाघमारे, अमोल म्हस्के, अक्षय गरुड, गणेश घनवट, मनोज साबळे, अनिल लिंबोळे, सोमनाथ भगत, गणेश रहाटे, गणेश जाधव, गोपाळ दहिफळे, आसिफ शेख, सिराज शेख, पांडा कुंभार, शाहिद शेख, अमोल पडेकर, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.

भीमआर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग तसेच प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील विद्यार्थी, कामगार वर्ग, महिला संघटन आदी उपक्रम राबविण्यात येणार असून भीमआर्मी ची ध्येय धोरणे ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संदीप शेलार यांनी सांगितले.





