- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशांताराम (बापू) कटके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शांताराम (बापू) कटके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

विविध स्पर्धांसह नेत्रदिप कीर्तन सोहळा संपन्न; नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
गजानन गव्हाणे पाटील
वाघोलीचे माजी उपसरपंच तथा अनंत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शांताराम बापू कटके यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात गेली सात दिवस कार्यक्रम पार पडले. यामध्ये भजन स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबीर आणि नेत्रदीपक असा कीर्तन सोहळा संपन्न झाला.
वाघोली गावचे माजी उपसरपंच शांताराम (बापू) कटके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आधार कार्ड व सुकन्या समृद्धी योजना तसेच अवघ्या 399 रुपयांमध्ये 10 लाखांचा अपघाती विम्याबरोबरच अत्यंत लाभदायक व किफायतशीर असणाऱ्या भारतीय डाक विभागाच्या अनेक योजनांचा लाभ सामान्य जनतेला सहजरीत्या मिळावा यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्ती करणे यासाठी जनतेला बरीच पायपीट करावी लागते. त्यामुळे लोकांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याच जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुमारे 130 पेक्षा अधिक लोकांनी आधार कार्डला लिंक केले तर दिडशेच्यावर लोकांनी नवीन आधार काढणे वा दुरुस्तीचा लाभ घेतला. त्याचबरोबर केवळ वार्षिक हप्ता 399 रुपयांमध्ये दहा लाखांचा अपघाती विम्याचा सुमारे दोनशे लोकांनी लाभ घेतला.
या मेळाव्यासाठी भारतीय डाक विभागाचे (पूर्व विभाग) जनसंपर्क अधिकारी गणेश खेडकर, आधारचे ऑपरेटर सौरभ जैस्वाल, संतोष भरेकर, मोबाईल नंबर लिंकसाठी व अकाऊंट ओपनिंगसाठी अमित नागने, पॉलीसी काढण्यासाठी पांडुरंग आनंदे आणि सुकन्या योजनेसाठी पोस्टमन नामदेव गवळी यांचेसह अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे योग्य पद्धतीने नियोजन करणाऱ्या सर्व जिवलग कार्यकर्ते, हितचिंतक, स्नेही, सहभागी नागरीक, ग्रामस्थांचे कटके यांनी आभार मानले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

 ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ’ या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात प्रेरणा दिली. संतांच्या भूमीत किर्तन सोहळ्याच्या निमित्ताने हिंदू धर्माचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचे नामस्मरण व्हावे हाच माझा उद्देश होता. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी सेवा देत समाजात आपल्या अमृतवाणीने समाज प्रबोधन केले, याचा विशेष आनंद वाटतो. – शांताराम (बापू) कटके (माजी उपसरपंच)

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page