गजानन गव्हाणे पाटील
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने हवेली तालुक्यातील केसनंद येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघ हवेली तालुका यांचे वतीने केसनंद येथे अतिशय उत्साहामध्ये स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती ग्रामपंचायत सभागृह या ठिकाणी संपन्न झाली.
यावेळी तालुक्यातील सुमारे एक हजार महिलांनी भगवे फेटे परिधान करून स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊं व मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांची रथामध्ये शिवालय मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या वाद्य पथकांच्या गजरामध्ये काढण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना व शिव वंदना घेण्यात आली व राजमाता जिजाऊंच्या प्रथमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सभागृह केसनंद या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये नलिनी वायाळ यांचे जिजाऊ चरित्रावर व्याख्यान झाले यावेळी बोलताना नलिनी वायाळ म्हणाल्या ” जर आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श मुलगा जन्माला यावा असं आपल्या माता भगिनींना वाटत असेल तर प्रत्येक घरामध्ये महिलेने जिजाऊ चरित्र आणि शिवचरित्र वाचले पाहिजे आणि दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या चरित्रातील संस्कारांचे आचरण केले पाहिजे”

या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष गुलाब दादा गायकवाड, केसनंद चे सरपंच दत्तात्रय हरगुडे, वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य अर्चना कटके, मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक सविता कांचन, जिल्हाध्यक्ष शैलजाताई दुर्गे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संगीता काळभोर, पुणे शहर उपाध्यक्ष नंदिनी मुरकुटे, राजमाता जिजाऊ संस्थेच्या रत्नाताई पिंगळे, पुणे शहर संघटक सुरेखा कांचन, पुणे शहर उपाध्यक्ष मिलन पवार, हवेली तालुका अध्यक्ष दादासाहेब भोंडवे, हवेली तालुका महिला अध्यक्ष लता हरगुडे, हवेली तालुका उपाध्यक्ष राहुल शिंदे, हवेली तालुका महिला संपर्कप्रमुख वैशाली गायकवाड, युवती आघाडी प्रमुख पूजा सणस, उद्योग आघाडी प्रमुख सारिका गावडे, शोभा हरगुडे, सीता जाधव, अर्चना सरोदे, सिद्धेश हरपळे, नवनाथ नेवाळे, शेखर साळुंखे, स्वाती चौधरी, रेखा चौधरी, उषा दाभाडे, मंगल नागवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





