- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रा. डॉ. सोमनाथ वसंतराव पाटील अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर सर्वाधिक मतांनी विजयी

प्रा. डॉ. सोमनाथ वसंतराव पाटील अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर सर्वाधिक मतांनी विजयी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ वसंतराव पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मते घेऊन प्रथम फेरीमध्ये विजयी झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणूकीची मतमोजणी विद्यापीठ आवारामध्ये संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामधील सर्व महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुखांनी सहभाग घेतला.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या विजयाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंददादा ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल मधील मुख्याध्यापिका व सर्व स्टाफ व संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. सोमनाथ पाटील यांचे अभिनंदन केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page