- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरुर शहरात विविध संस्था संघटना यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन

शिरुर शहरात विविध संस्था संघटना यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन

- Advertisement -spot_img

शिरुर : प्रतिनिधी
समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदी, आखिल भारतीय मराठा महासंघ शिरुर यांच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जुन्या शिरुर नगरपरिषद कार्यालय इमारती जवळ करण्यात आले .
यावेळी नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, आखिल भारतीय मराठा महासंघाचा शोभना पाचंगे, तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, रावसाहेब चक्रे , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, रवींद्र सानप, किरण बनकर, रामभाउ शेटे, राजेंद्रराव जाधवराव, नाथा पाचर्णे, उमेश शेळके, बाबुराव पाचंगे, रमेश दसगुडे, योगेश महाजन, बिजवंत शिंदे, खुशाल गाडे, सागर नरवडे, निलेश नवले, गणेश खोले, रुपेश घाडगे, अविनाश जाधव, वैशाली गायकवाड, विजया टेमगिरे, ज्योती हांडे आदी उपस्थित होते .
मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे यावेळी बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनी केले. नायब तहसिलदार गिरीगोसावी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात, साधना शितोळे, प्रा.अशोक शेळके, किरण पठारे, कुमारी आदलिंगे आदीची मनोगते यावेळी झाली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. त्यात संघाचा वतीने भविष्यात मुलीसाठी वसतिगृह व ग्रंथालय व अभ्यासिका सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. सूत्र संचालन समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे उपाध्यक्ष संजय बारवकर यांनी केले . आभार माजी सरपंच वर्षा पोटावळे यांनी
मानले.
यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदी व आखिल भारतीय मराठा महासंघ शिरुर यांच्या वतीने करण्यात आले होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page