गजानन गव्हाणे पाटील
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील छत्रपती संभाजी हायस्कूल मधील विद्यार्थी सूरज पांडुरंग राऊत याने नुकत्याच झालेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक परीक्षा Nmms व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित करून जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्याचा नुकताच संस्थेच्या स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच NNMS शिष्यवृत्ती मधे ६ विद्यार्थी, सारथी शिष्यवृत्ती १ विद्यार्थी तर ८ वी शिष्यवृत्ती मधे १ विद्यार्थी आला असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक कुंभारकर यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष रवींद्र फडतरे, सदस्य तुळशीदास फडतरे, सदस्य व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक कुंभारकर आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्याला वर्षा वाजे, सुनीता सुतार, अमोल कोंढार, वर्षा परीट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यापुढील काळात जास्तीत जास्त विद्यार्थी विविध परीक्षा व स्पर्धांमध्ये विद्यालयाचे नाव उचलावे असे मत यावेळी समितीचे अध्यक्ष रवींद्र फडतरे यांनी व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाल्यानंतर त्यांचा सन्मान केल्याने अनेक मुलांना प्रेरणा मिळत असल्याचे बापूसाहेब शिंदे यांनी यावेळी सांगितले.





