- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकेसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रय मारुती हरगुडे तर उपसरपंच पदी सुरेखा सुभाष बांगर बिनविरोध

केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रय मारुती हरगुडे तर उपसरपंच पदी सुरेखा सुभाष बांगर बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रय मारुती हरगुडे तर उपसरपंच पदी सुरेखा सुभाष बांगर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. सरपंच सचिन हरगुडे व उपसरपंच अक्षदा हरगुडे यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या निवडीत सरपंच पदासाठी दत्तात्रय हरगुडे व उपसरपंच पदासाठी सुरेखा बांगर यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर जल्लोष करण्यात आला. सरपंच नावाचा मोठा हार बनविण्यात आला होता. मित्र व समर्थक यांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण करण्यात आली. ग्रामसेवक प्रदीप ढवळे, अशोक शिंदे, अनिल बगाटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी पॅनल प्रमुख मिलींद नाना हरगुडे, छावा ग्रुपचे संदिप ढोरे, उमेश मोरे, सचिन हरगुडे, अॅड. अनिल हरगुडे, निखील ढोरे, गणेश गावडे, भरत वाबळे, सागर हरगुडे, तान्हाजी हरगुडे, एस पी हरगुडे, रमेश हरगुडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा शोभा हरगुडे, तालुका उपाध्यक्ष सीता जाधव, युवक चे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे, ग्रामपंचायत चे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

सर्वसामान्य कुटुंबातील सरपंच मित्राला मित्रांकडून आलिशान कार भेट
सर्वसामान्य कुटुंबातील दत्तात्रय हरगुडे यांची निवड होताच सरपंचांना आश्चर्यांचा धक्कादेत सुमारे 46 लाख रुपये किंमतिची अलिशान कार मित्रांनी भेट दिली. मित्रांच्या या अनोख्या भेटीने सरपंच हि भारावून गेले. यावेळी फटाके व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page