गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष बबनराव म्हाळसकर व शिरुर शिक्षक मित्र परिवार आयोजित शिरुर टीचर्स प्रीमियर लीग २०२३ भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेत तळेगाव ढमढेरे बीटचा राजगड फायटर्स व सरदवाडी बीटचा सिंहगड योद्धाज संघाचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघाला संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
शिरुर हवेलीचे आमदार अॅड.अशोकबापू पवार यांच्या हस्ते दोन्हीही संघाचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. शुभेच्छा देतांना आमदार अशोकबापू पवार म्हणाले,”दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अशाप्रकारच्या विविध खेळांच्या स्पर्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती मार्फत भरविल्या पाहिजेत यातून शिक्षकांचे सक्षमीकरण होईल.
सलग तीन दिवस कळवंतवाडी, आंबळे या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संतोष पवार, उत्कृष्ट गोलंदाज रविंद्र गायकवाड, उत्कृष्ट फलंदाज व सलग तीन षटकार जालिंदर मोहिते, सलग तीन चौकार संतोष गावडे तर सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून पंचायत समिती कर्मचारी यांच्या प्रतापगड टायटन्स या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे मानकरी तळेगाव ढमढेरे बीटचा शिवनेरी स्मशर्स व न्हावरे बीटचा रायगड रेंजर्स हे संघ ठरले.
राजगड फायटर्स संघाचे संघमालक तुकाराम सातकर /संतोष गावडे हे होते. तर कोच म्हणून सुरेश सातपुते व अविनाश चव्हाण मार्गदर्शन केले. तसेच शिवनेरी स्मॅशर्स संघाचे संघमालक रामदास थोरात /शैलेश बोऱ्हाडे तर कोच म्हणून जयवंत भुजबळ व सुरेश भंडारे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पडवळ यांनी केले तर आभार आनंद लोंढे यांनी मानले.





