- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआव्हाळवाडीच्या उपसरपंचपदी बदामबाई आव्हाळे बिनविरोध

आव्हाळवाडीच्या उपसरपंचपदी बदामबाई आव्हाळे बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वाघोलीलगत असणाऱ्या आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बदामबाई आव्हाळे यांची बिनविरोध निवड झाली. आव्हाळे या चालू पंचवार्षिक मधील पहिल्या तर आव्हाळवाडीच्या ४० व्या उपसरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बदामबाई दत्तात्रय आव्हाळे या खंडोबा प्रगती पॅनलकडून वॉर्ड क्रमांक पाच मधून ६५३ मते घेऊन त्या निवडून आल्या आहेत. नवनिर्वाचित सरपंच नितीन घोलप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पद निवडणुकीत आव्हाळे यांच्यासह प्रशांत सातव यांनी अर्ज दाखल केला होता. सातव यांनी अर्ज माघारी घेतल्याने आव्हाळे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
खंडोबा प्रगती पॅनल पॅनलने सरपंच पदासह आठ जागा मिळविल्याने उपसरपंच त्यांच्याच पॅनलचा होणार हे निश्चित होते. बदामबाई आव्हाळे यापूर्वीही ग्रामपंचायत सदस्य होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक अतुल कोहिनकर यांनी काम पाहिले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी हवेली नायब तहसीलदार संजय भोसले, वाघोली गावकामगार तलाठी स्वप्निल पतंगे, पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख माऊली (आबा) कटके, पंचायत समिती सभापती नारायण आव्हाळे, पंचायत समिती माजी सदस्य सुरेशबापू सातव, साहेबराव आव्हाळे, माजी सरपंच रामदास आव्हाळे, माजी सरपंच प्रवीण आव्हाळे, माजी सरपंच हेमंत सातव, सोमनाथ आव्हाळे, खडोंबा प्रगती पॅनलचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page