- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी पतसंस्थेचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात

हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी पतसंस्थेचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पेरणे फाटा, ता. हवेली येथील गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या, चांगली आर्थिक उलाढाल असणाऱ्या हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी पतसंस्थेचा 13 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी पेरणे व परिसरातील गावांमधील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नियुक्त झालेल्या सरपंचांचा पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.


मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या तसेच चांगल्या नावारूपाला आलेल्या, पेरणे गाव व आसपासच्या गावांमधील शेती क्षेत्र, उद्योग व्यवसाय, यांना वित्त पुरवठा करून त्यांना वृद्धिंगत करणाऱ्या या संस्थेची सामाजिक बांधिलकी बहुचर्चित आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या पतसंस्थेने परिसरातील उद्योग व्यवसायांना पाठबळ दिले आहे, आर्थिक उलाढाल चांगली असून संस्था नावा रूपाला आणण्यासाठी हवेली तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सागर नाना चौधरी यांचे खूप कष्ट आहेत.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पुनमताई सागरनाना चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग ज्ञानोबा खेडेकर, संचालक सागरनाना हनुमान चौधरी, अविनाश नामदेव जगताप, जयवंत म्हस्कु चौधरी, दिनकर ज्ञानोबा गव्हाणे, विठ्ठल भगवान चौधरी, अमोल शंकर चौधरी, तानाजी विलास चौधरी, ज्ञानेश्वर गुलाब जवळकर, शिवाजी सोमा केसकर, रेश्मा मोहन चौधरी, तज्ञ संचालक संभाजी हिरामण वाळके, गोरख निवृत्ती चौधरी, सल्लागार संचालक रघुनाथ किसन चौधरी, नितीन पोपट गव्हाणे, केशव विठ्ठल चौधरी आदी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page