हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यात उन्नती महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या जयंती निमित्ताने भोर येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असणाऱ्या कु. अनुष्का आनंद सोनवणे या एका गरीब मुलीला उन्नती महिला प्रतिष्ठान ने दत्तक घेतले असून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील ते करणार आहेत असे अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमा प्रसंगी उन्नती महिला प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सीमा तनपुरे, भाग्यश्री वरटे, स्मिता सुर्वे, निशा कडू,व द्रौपदी तनपुरे सह आदी सहकारी वर्ग उपस्थित होते.





