गजानन गव्हाणे पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाडेगाव (वाडेबोल्हाई) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित सुरू आहे. या शिबिराचे उद्घाटन मंथन फाउंडेशनच्या प्रमुख अशा भट्ट व भारतीय जैन संघटना पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापक साळुंखे सर यांच्या हस्ते वाडेगाव येथे झाले. या शिबिराकरिता एकूण 100 विद्यार्थी उपस्थित आहेत.
या उद्घाटन प्रसंगी आशा भट्ट यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्व या संदर्भात माहिती सांगितली. महाविद्यालयाकडून समाजसेवेचे बाळकडू घेऊन समाजासाठी कसे काम करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच साळुंखे सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू व त्याचे कार्य यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाडेगावचे सरपंच दीपक गावडे यांनी विद्यार्थ्यांना सात दिवस श्रमदानाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य संजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सात दिवसात आपल्या जीवनातील कोणती शिदोरी घ्यायची व त्याचा वापर आपल्या जीवनात कसा करायचा या संदर्भात मार्गदर्शन केले. या सात दिवसात विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, मतदार नोंदणी आरोग्य शिबीर वृक्षरोपण व काही उद्योजकतेच्या संदर्भात कार्य करणार आहेत. या सर्व कामासाठी संस्थेतील पदाधिकारी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.

या सर्व कार्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. चक्रधर शेळके, डॉ. स्वाती कोलट, प्रा. साखरे, प्रा. सिद्धेश्वर गायकवाड, प्रा. बळवंत लांडगे, डॉ. गुलालकरी, प्रा. घेमूड प्रा. फुलारी, प्रा. आगळे, प्रा. सांगोळे, प्रा.सुभाष शिंदे, गावातील उपसरपंच, ग्रामसेवक, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सुनिल शिंदे, गुरव उपस्थित होते.





