गजानन गव्हाणे पाटील
मराठी पत्रकारितेचे जनक “दर्पण” कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच आपल्या लेखणीतून समाजात जागृतीचे कार्य आणि विकासाच्या कामात मोठे योगदान ग्रामिण भागातील पत्रकार करीत असतात असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शिरुर तालुक्यातील नेते कैलासराव सोनवणे यांनी केले.
कोरेगाव भीमा, ता.शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या वेळी सोनवणे बोलत होते.
मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष के. डी. गव्हाणे, शंकर पाबळे, गजानन गव्हाणे पाटील व इतर वृत्तपत्रांचे वार्ताहर, सोशल मिडिया चे प्रतिनिधी यांचा नवीन वर्षाची डायरी, पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले

यावेळी माजी सरपंच संजय काशिद, डॉ. संतोष नप्ते, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनकर गव्हाणे, नितीन पोपट गव्हाणे, भगवान परदेशी, राजेंद्र गवदे, अरविंद शिंदे, सागर गव्हाणे, विनोद दोंडकर, आनंदा पवार आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते
सुरेंद्र भांडवलदार यांनी सुत्रसंचालन केले तर रामदास वाघमारे यांनी आभार मानले





