- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत संपन्न

जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत संपन्न

- Advertisement -spot_img

जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुयायांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील पेरणे येथे सकाळपासून 205 वा जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात सुरु झाला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.


जयस्तंभ अभिवादनासाठी अनुयायांनी पहाटेपासून गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाच्या उत्तम नियोजनमुळे अभिवादन सोहळा शिस्तीत पार पडला. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेऊन होते.


जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा देत आरोग्य पथकाद्वारे गरजूंना सेवा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः परिसराला भेट देऊन या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
पीएमपीएमएलने लोणीकंद आणि कोरेगाव भीमा अशा दोन्ही बाजूने प्रत्येकी १४० बसेस सुरू ठेवल्या बसेसच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे २ हजार ८०० फेऱ्या झाल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून अभिवादन
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जि. प. चे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनीही जयस्तंभास अभिवादन केले. यावेळी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी, सहायक आयुक्त संगिता डावखर आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page