गजानन गव्हाणे पाटील
पेरणे, ता. हवेली येथे २०५ व्या शौर्यदिनी जय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना पेरणे ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन भीमसैनिकांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी पेरणे गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच उषा दशरथ वाळके, माजी सरपंच रुपेश ठोंबरे, अक्षय वाळके, गणेश हिरामण येवले, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक गजानन पवार, अश्विनी रुपेश ठोंबरे, दशरथ वाळके, मधुकर वाळके, शिवाजी येवले शरद माने, सुजय वाळके, अलका वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.





