भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असे औचित्य साधून बालवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांचे संकल्पनेने लोकसहभागातून ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजन होऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी शाळेत फिरत्या वाचनालयाचा शुभारंभ अॅडव्होकेट प्रशांत फणसे व पुनम फणसे यांचे हस्ते करण्यात आला.
बहुवर्ग अध्यापन पद्धतीमध्ये आणि ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे भविष्यातील स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना या फिरत्या वाचनालयाचा चांगला उपयोग होईल असे प्रशांत फणसे यांनी सांगितले. मा. प्राचार्य शामराव शिंदे,वि.का.सो.चेअरमन बाळासाहेब फणसे,भोर तालुका खरेदी विक्री संघ संचालक अतुल किंद्रे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी सरपंच सुवर्णा किंद्रे, उपसरपंच मच्छिंद्र फणसे, शा.व्य.समिती अध्यक्ष संतोष किंद्रे, चेअरमन बाळासाहेब फणसे, प्राचार्य शामराव शिंदे, माजी सरपंच अतुल किंद्रे, अॅड.विकास किंद्रे, सुरेश किंद्रे, गोकुळ फणसे, विठ्ठल किंद्रे, संजय किंद्रे, जयवंत किंद्रे, योगेश किंद्रे, बापू निकम, तानाजी किंद्रे उपस्थित होते.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत फणसे यांनी आर्थिक मदत केली. गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे, विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे, केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे शिक्षिका अंजना कोंढाळकर यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक महादेव बदक व आनंदा सावले यांनी आभार मानले.





