- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे +२ विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न

मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे +२ विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
मॉडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे कनिष्ठ महाविद्यालय +2 स्तर राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर नुकतेच फुलगाव ता. हवेली जि.पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उदघाटन फुलगावच्या सरपंच मंदाकिनी साकोरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपस्थित होते.
या प्रसंगी माजी उपसरपंच राहुल वागस्कर, माजी सरपंच कांताराम वागस्कर, सुनील वागस्कर राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. पी. एम. सांबारे तसेच मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील डोईफोडे उपस्थित होते. या सात दिवसांच्या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले गेले. योगगुरू अजित रणसिंग यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून निरोगी आयुष्यासाठी योग व प्राणायाम यांचे महत्त्व पटवून दिले. माजी आमदार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर परिश्रम करा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा असे ते म्हणाले.


भारत मातेचे सुपुत्र मेजर महेंद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अंगावर रोमांच उभे राहतील असे अनुभव सांगून विद्यार्थ्यांच्या मनातील देशभक्ती जागृत केली. विद्यार्थ्यांनी आर्मीमध्ये भरती होऊन देशाच्या संरक्षणासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. पावनखिंड, मनकर्णिका आणि सरसेनापती हंबीरराव यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटात युद्ध प्रसंगांचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक अशोक पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना लाठी काठी आणि दांडपट्टा यांची प्रात्यक्षिके करून दाखवली आणि विद्यार्थ्यांकडून करून देखील घेतली.
प्रा. सुजाता गांगुर्डे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य व विविध उपक्रमांची माहिती दिली. व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या जीवनातील अध्यात्माचे महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थी रवींद्र शिंदे याने गावातील गणेश मंदिरात भानोबा देवाच्या पालखी निमित्ताने गणेश मंदिरात कीर्तन सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली. या सात दिवसात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून वृक्षारोपण, गावातील मंदिर व घाट परिसराची स्वच्छता इ. कामे केली. तसेच गावातील ग्रामस्थांशी संपर्क साधून गावच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे घटक तसेच भविष्यकालीन योजनांविषयी चर्चा केली. शिबिराच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.अशाप्रकारे व्याख्याने, गटचर्चा, प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष अनुभव, वृक्षारोपण, श्रमदान, ग्रामविकास, सामाजिक बांधिलकी, देशभक्ती, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याविषयी जागरूकता इ. गोष्टी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवता आले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या शिबिराच्या समारोपप्रसंगी समारंभाचे अध्यक्षस्थान मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी भूषविले. यावेळी त्यांनी राष्ट्र उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. फुलगावचे माजी उपसरपंच राहुल वागस्कर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी फुलगावचे माजी सरपंच कांताराम वागस्कर, सुनील वागस्कर, मुलींच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, अशोक पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. पी. एम. सांबारे, मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुभाष कारेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. वाल्मीक वाघ, प्रा. डॉ. वैशाली आहेर, प्रा. विठ्ठल देवढे, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या सात दिवसीय हिवाळी शिबिरातून उत्कृष्ट स्वयंसेवकांना प्राचार्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. वाल्मीक वाघ, प्रा. डॉ. वैशाली आहेर आणि प्रा. विठ्ठल देवढे तसेच प्रा. रुपाली अहिरे , प्रा. वर्षा राठोड, प्रा. अश्विनी देशकर, प्रा. सुनीता निघोट, प्रा. नंदा दिंडोरे, प्रा. मनीषा मांढरे, प्रा.नेहा ढेंबरे, प्रा. अविनाश पाटील, प्रा. ॲन जॉय, प्रा. अंजली जोशी, कानिफनाथ शिंदे, अर्जून शिंदे, कामिनी मॅडम, भोसले सर, बापू काळे, प्रकाश साबळे व सहकारी, शिवराज इंगळे, सौ. करुणा, श्रद्धा भोसले, कु. रेश्मा नांगरे यांचे देखील सहकार्य मोलाचे ठरले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री विनोद सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी वाल्मीक वाघ यांनी केले आणि डॉ. वैशाली आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page