- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपीएमपीएमएल कडून विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन

पीएमपीएमएल कडून विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
 पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दि. १ जानेवारी २०२३ रोजी पेरणे येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
पेरणे येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच व व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात. या अनुयायांच्या सोयीसाठी तसेच जादा प्रवासी संख्या विचारात घेत पीएमपीएमल प्रशासनाच्या वतीने 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी जादा बसेस चे नियोजन करण्यात आले आहे.
31 डिसेंबर रात्री 9 ते 1 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान येथून 40 बसेस, वढू फाटा (इनामदार हॉस्पिटल) ते वढू बुद्रुक 5 बस, तोरणा हॉटेल (शिक्रापूर) ते कोरेगाव भीमा 35 बसेस अशा एकूण 80 बसेस मोफत (विना तिकीट) असणार आहेत. तसेच 1 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबाचा माळ, फुलगाव शाळा ते पेरणे टोल नाका 140 बसेस तर शिक्रापूर तोरणा हॉटेल ते कोरेगाव भीमा 115 बसेस आणि वढू फाटा ते वढू बुद्रुक पर्यंत 25 बसेस अशा एकूण 280 बसेस मोफत (विनातिकीट) बसेस चे नियोजन करण्यात आले आहे.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध स्थानकांवरून प्रवास भाडे आकारणी करून जादा बसेसचे देखील देखील करण्यात आले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page