- Advertisement -spot_img
Homeक्रीडाजिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत श्री वीर बाजी प्रभू विद्यालयाचा शिंद द्वितीय...

जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत श्री वीर बाजी प्रभू विद्यालयाचा शिंद द्वितीय क्रमांक

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व नूतन माध्यमिक विद्यालय वडकी ता. हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री विर बाजी प्रभू विद्यालय शिंद या विद्यालयातील मुलींच्या टीमने द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डी. एस. गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देत असताना त्यांच्या सर्वांगाच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील मुलानं बरोबर मुली ही कमी लेखता कामा नये दुर्गम डोंगरी भागातील मुलींनी हे सिद्ध करून दाखविले. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व नूतन माध्यमिक विद्यालय वडकी ता. हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत श्री वीर बाजी प्रभू विद्यालय शिंद या विद्यालयातील मुलींनी खो खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून इतर विद्यार्थ्यांच्या पुढे एक आदर्श ठेवला आहे.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या सर्व खेळाडूना क्रीडा शिक्षक महेश खुटवड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेचे सचिव मा. संदीप कदम, उपाध्यक्ष मा.राजेंद्र घाडगे , उपसचिव मा. एल. एम. पवार तसेच शिंद गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, पालक, ग्रामस्थांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले व शुभेच्छा ही दिल्या.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासा बरोबर क्रीडा विषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.भौधिक क्षमते बरोबर शरीर सुदृढ असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी असा स्पर्धा गावपातळीवर सुध्दा घेणे गरजेचे आहे. मूल व मुली भेदभाव नाकारता सर्व खेळ मुली ही खेळू शकतात फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते.असे मत “आपली लोकशाही” शी बोलताना मुख्याध्यापिका डी. एस. गायकवाड यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page