भोर प्रतिनिधी : स्वप्नीलकुमार पैलवान
मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत बापू यादव चेमटे यांनी एक सुवर्णपदक व दोन रौप्य पदक पटकविले.
तालुका भोर येथील राजगड ज्ञानपीठ संचलित या संस्थेतील शिक्षक बापू चेमट यांनी मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित मैदानी स्पर्धेत ४००मीटर हर्डल्स या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक, १०० मीटर हर्डल्समधे रौप्य पदक व ५० वयोगट यामध्ये २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले.
त्यांची वाराणसी (उत्तर प्रदेश) या ठिकाणी फेब्रुवारी २०२३ मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली आहे. ते सध्या मुरारबाजी देशपांडे विद्यालय वाठार हिंगे ता.भोर या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी सुवर्ण व रौप्य पदक पटकावले असल्याने ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तरुणांसाठी शिक्षणाबरोबर शरारिक दृष्टया ही जोपासना झाली पाहिजे.
राजगड ज्ञानपीठ चे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री अनंतरावजी थोपटे,आमदार संग्रामदादा थोपटे , संस्थेच्या सचिव स्वरुपाताई थोपटे, संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी जे. टी. थोर, मुख्याध्यापक मधुकर कदम यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले. बापू चेमटे यांना जेष्ठ क्रीडाशिक्षक राजेंद्र शेटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

मुख्य म्हणजे खेळाला वय नसते, क्रीडा स्पर्धा साठी सराव व आत्मविश्वास महत्वाचा असतो. चेमटे सरांनी या पदकांची कमाई करून इतर ज्येष्ठ व तरुणा पुढे आदर्श ठरत आहेत. मुलांना मार्गदर्शन करीत स्वतःही करून दाखविले आहे.विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे मत राजगड ज्ञानपीठ च्या सचिव स्वरुपा थोपटे “आपली लोकशाही” शी बोलत होत्या.





