गजानन गव्हाणे पाटील
दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था (महाराष्ट्र राज्य व कुटुंब फाउंडेशन (भारत) यांच्या संयुक्त विद्यमानाने घरोघरी रक्तदाता , घरोघरी संविधान या उपक्रमांतर्गत ऐतिहासिक धम्मभुमी देहूरोड पुणे येथे स्वैच्छिक रक्तदान शिबिर संपन्न झाले.

रक्तदान हे श्रेष्ठदान तसेच संविधान घरोघरी पोहोचविण्याची आवश्यकता आहे. संविधान घरोघरी पोहोचविण्याची युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मानवी शरीरासाठी रक्त जसे महत्त्वाचे आहे, तसेच देश सुरक्षित राहण्यासाठी संविधान महत्वाचे आहे. येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास रक्तदानाचे व भारतीय संविधानाचे महत्व पटवून देऊन प्रत्येक रक्तदात्यास भारतीय संविधान प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसिद्ध निवेदक दिपक म्हस्के व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गजवार यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी सैनिक सहदेव इंगळे, आर.पी.आय.वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीज भाई शेख, अध्यक्ष मिलिंद शेजवळ, राष्ट्रवादी काॅग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष कोथरूड आमीन शेख, उद्योजक शरद शेंडगे, कल्पतरु फाउंडेशनचे अध्यक्ष विकास झेंडे तसेच दिवांकुर संस्थेचे व कुटूंब फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

” प्रत्येक घरातून रक्तदात्यास प्रोत्साहन मिळावे व रक्ता अभावी कुणाला जीव गमवावा लागू नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने रक्तदानाला महत्व द्यावे असे मत संस्थेचे संस्थापक लक्ष्मण म्हस्के यांनी व्यक्त केले.”
दिवांकुर संस्थेच्या अध्यक्षा अर्चनाताई म्हस्के यांनी आलेल्या प्रत्येक रक्तदात्यांचे आभार मानले व ज्याप्रमाणे आपण स्वतः रक्तदान करून एका वेळी तीन जिवांचे रक्षण करतो, त्याप्रमाणे इतरांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे असे आव्हान केले. तसेच संस्थेच्या माध्यमातून असेच विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात. सामाजीक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन श्रीकांत हिरवे व विजेंद्र शिंदे यांनी केले.





