निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर च्या पश्चिमेकडील दुर्गम असलेल्या वेळवंड खोऱ्यातील पसुरे येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुणे स्थित आय. टी. क्षेत्रातील नामांकित कंपनी द्रुव सॉफ्टवेअर यांच्या वतीने पसुरे येथील विद्यार्थ्याला व विद्यालयाला लॅपटॉप वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टोंगेवाडी – पसुरे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शाळेसह सिद्धार्थ शरद धुमाळ या एका होतकरू व गरजू विद्यार्थ्याला लॅपटॉप देण्यात आला.

यावेळी सुभाषदादा बोडके आणि सर्व अधिकारी वर्ग – द्रुव सॉफ्टवेअर कंपनी, शारदाकाकी राजेंद्रआबा धुमाळ सरपंच,पसुरे, राजेंद्रआबा धुमाळ मा. उपसरपंच, पसुरे, रमेश धुमाळ नवनिर्वाचित सदस्य- ग्रा. पं. पसुरे, अश्विनी धुमाळ नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्या, विजय धुमाळ व्हा.चेअरमन, विकास सोसायटी पसुरे, उद्योजक प्रशांत धुमाळ, गणेश धुमाळ, किरण धुमाळ, मनोज धुमाळ, गौतम जाधव, वनश्री धुमाळ आदी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक अष्टेकर गुरुजी यांनी मानले.





